बीड दि.१५ – ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ५ ते ८ वी शाळा बंद होत्या. परंतु आता २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वी च्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१५) शिक्षण विभागाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी २७ जानेवारीपासून शाळा सुरू होतील अशी माहिती दिली आहे. विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक सर्व नियम पाळून शाळा सुरू कराव्यात असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सूचित केले असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
दरम्यान मुंबई वगळता राज्यातील शाळा सुरू होणार असल्या तरी मुंबई तील शाळा मात्र सुरू होतील की नाही हे ठरवण्यात येणार आहे तर शाळा बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार ज्या त्या जिल्ह्याला दिले आहेत.