Site icon सक्रिय न्यूज

पहा केज तालुक्यात कुठे किती झाले मतदान……!

केज दि.१५ – गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या गावागावातील गाठीभेटी, उमेदवारांची धावपळ, कार्यकर्त्यांची चढाओढ आज संपली आहे. तालुक्यातील १९ (चार बिनविरोध)  ग्रामपंचायत निवडणुकीचं मतदान मोठ्या उत्साहात पार पडलं. सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शेकडो उमेदवारांचं भविष्य मतपेटीत बंद झाले असून हजारो कार्यकर्त्यांचे जीव टांगणीला लागले आहेत.मात्र उमेदवार आणि कार्यकर्त्यांना निकालासाठी १८ जानेवारीची  वाट पाहावी लागणार आहे.

शेअर करा
Exit mobile version