Site icon सक्रिय न्यूज

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरातील एक किमी अंतरातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश…….!

अंबाजोगाई दि.१६ – तालुक्यातील लोखंडी सावरगाव परिसरात मृत्यू झालेल्या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लू नेच झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
         दरम्यान सदरील परिसरात असलेल्या कोंबड्यांपासून जिल्ह्यात इतर भागात संसर्ग होऊ नये म्हणून लोखंडी सावरगाव परिसरातील एक किमी अंतरातील कोंबड्याचे कलिंग अर्थात विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले आहेत.
       जिल्ह्यातील आष्टी पाटोदा परिसरात सुरू झालेला बर्ड फ्लू चा फैलाव आता अंबाजोगाई तालुक्यापर्यंत येऊन पोहोचला असून परिसरातील कुक्कुट व्यावसायिक संकटात सापडले आहेत.
शेअर करा
Exit mobile version