Site icon सक्रिय न्यूज

पत्नीच्या निधनाची वार्ता कानावर पडताच पतीलाही हार्ट अटॅक, धारुर शहरातील घटना……!

बीड दि.१६ – धारूर शहरातील  अजीजपुरा भागात राहणाऱ्या पत्नीचे निधन झाल्याची वार्ता कानावर पडताच पतीलाही हार्ट अटॅक आल्याची घटना घडली असून या घटनेने संपूर्ण शहर हळहले आहे.
           धारुर शहरातील शेख रहिम शेख लाल यांच्या पत्नी हसीना (५४) यांना उपचारासाठी लातूर येथील खाजगी दवाखान्यात चार दिवसांपुर्वी दाखल करण्यात आले होते. त्यांचे उपचार सुरु असताना काल दुपारी चारच्या सुमारास निधन झाले. यावेळी दवाखान्यात उपस्थित असलेले पती शेख रहिम (५८) यांना पत्नीचे निधन झाल्याचे कळताच तीव्र हृदयविकाराचा धक्का आला. या धक्क्यात त्यांची तत्क्षणी प्राणज्योत मावळली. शेख रहिम हे शहरातील नामांकित व्यापारी होते. दि.१६ शनिवारी सकाळी ११.३० वाजता मयत दाम्पंत्यावर धारुर शहरातील तहसील कार्यालयासमोरील तकीया तलाव परिसरातील कब्रस्तानमध्ये शेकडोंच्या उपस्थितीत दफनविधी करण्यात आला.
शेअर करा
Exit mobile version