Site icon सक्रिय न्यूज

“या” कारणामुळे दोन दिवस लसीकरण राहणार बंद….…..!

मुंबई दि.१७ – पहिल्या दिवशीचे लसीकरण सुरळीत पार पडल्यानंतर या लसीकरणाच्या मोहिमेत काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. यामुळे लसीकरण बंद राहणार आहे.रविवारी मुंबई आणि राज्यात होणारे कोरोनाविरोधातील लसीकरण बंद राहणार आहे. सोमवारीही लसीकरण सुरू होईल की नाही याबाबत शंका आहे.

कोरोना लसीकरणाची नोंदणी ठेवणाऱ्या को-विनअ‍ॅपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हे लसीकरण रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दि.१६ रोजी लसीकरणाचा शुभारंभ झाल्यानंतर सर्व केद्रांवर लसीकरणाला सुरुवात झाली होती.

शेअर करा
Exit mobile version