Site icon सक्रिय न्यूज

आरोग्य विभागात मेगा भरती, उद्या निघणार जाहिरात तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळणार……!

आरोग्य विभागात मेगा भरती, उद्या निघणार जाहिरात तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळणार……!

बीड दि.१७ –  राज्याच्या आरोग्य विभागात 17 हजार पदांची भरती होणार आहे. यापैकी 8 हजार 500 पदांची भरती निघणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. उद्या नोकर भरतीची जाहिरात निघेल तर 15 फेब्रुवारीपर्यंत नोकर भरतीचं काम पूर्ण होईल, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

17 हजार पैकी 8 हजार 500 पदे ही ग्रामविकास विभागशी संबंधित आरोग्य विभागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आहेत. त्यामुळे 2 टप्प्यात ही नोकर भरती होणार आहे. 56 संवर्गात ही नोकर भरती होणार असून या सर्व पदासाठी परीक्षा प्रक्रिया होणार आहे. साधारण 15 फेब्रुवारीपर्यंत परिक्षा आणि त्यांनतर 2 ते 3 दिवसात निकाल लागणार असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नोकरीचं कंत्राट संपलं असलं तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी नोकर भरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version