मुंबई दि.१७ – सैफअली खान, डिम्पल कपाडिया यांची मुख्य भूमिका असलेली तांडव ही वेब सीरिज आता वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. बेव सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या काही भागामुळे हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचं सांगण्यात आलं आहे. यापुढे चित्रपट विश्वातील लोकांनी हिंदू देवी-देवतांचा अवमान केल्यास त्यांना भरचौकात जोड्यानं फटकावलं जाईल, असं भाजप नेते राम कदम म्हणाले आहेेेत.
कोणत्याही परिस्थितीत तांडव या वेब सीरिजवर बहिष्कार टाकण्यात येईल. त्या सीरिजचे अभिनेते दिग्दर्शकांवर एफआयआर दाखल झाला पाहिजे. त्यांनी हिंदू देवीदेवतांचा अवमान करण्याचं कृत्य केलं आहे. त्यांनी हात जोडून, गुडघे टेकून समस्त देशाची आणि हिंदू समजाची माफी मागायला हवी, असं राम कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राम कदम यांनी तांडव या वेब सीरिजमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.