Site icon सक्रिय न्यूज

ज्यांनी गाव स्वयंपूर्ण करून देशात नाव केले, ज्यांच्या कामाचे अनुकरण केल्या जाते अश्या विकास पुरुषाच्या मुलीला गावकऱ्यांनी नाकारले…….! 

औरंगाबाद दि.१८ – ज्यांनी स्वतःच्या गावाला स्वयंपूर्ण केले, ज्यांचे विचार देशभर आदर्श म्हणून ऐकले जातात, ज्यांच्या कामाचे अनुकरण केले जाते अश्या विकास पुरुषाच्या मुलीला त्याच गावाने निवडणुकीत नाकारले. भास्करराव पेरेंच्या पाटोदा  ग्रामपंचायतीच्या निकालाने पेरेंना मोठा धक्का बसला आहे. सर्वांचं लक्ष लागून असलेेल्या भास्कररावांच्या मुलीचा पराभव झाला आहे.

भास्कररावांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांंच्या जागी त्यांची मुलगी अनुराधा पाटील  ग्रामपंचायत निवडणुकीला उभी राहिली होती. मात्र अनुराधा पेरेंच्या विरोधात उभ्या असलेल्या उमेदवाराला 208 मते मिळाली तर अनुराधा यांना 183 मते मिळाली. अकरा सदस्य असलेल्या पाटोद्याच्या ग्रामपंचायतीमध्ये आधीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे तीन जागांसाठी मतदान झालं. यापैकी एका जागेवर अनुराधा पाटील उभ्या राहिल्या होत्या.

दरम्यान, अनुराधा पाटील यांच्या पराभवाने भास्करराव पेरेंच्या गटाबद्दल असलेली नाराजी निकालातून दिसून आली आहे. या निकालावर भास्कररावर पेरे-पाटील काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

शेअर करा
Exit mobile version