औरंगाबाद दि. 18 – औरंगाबादमधील एका ग्रामपंचायत निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं. आई विरोधात मुलानं वडिलांचं पॅनल उभं केल्यानं निवडणुकीचा निकाल काय लागणार ? याबाबत सर्वांना उत्सुकता होती. मात्र पिशोरी ग्रामपंचायतीचा निकाल लागला अन दोघांनाही मतदारांनी नाकारत कौटुंबिक वाद घरातच ठेवला.
त्याचे झाले असे, केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांची कन्या संजना जाधव आणि जावई हर्षवर्धन जाधव यांनी एकमेकांविरोधात निवडणुक लढवली होती. मात्र पिशोरी ग्रामस्थांनी संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांना नाकारलं असून दोघांचाही पराभव झाला आहे. हर्षवर्धन जाधव यांना 17 पैकी 4 जागा जिंकता आल्या. तर संजना जाधव यांना फक्त 2 जागा मिळाल्या. या निवडणुकीत महाविकास आघाडीनं 9 जागांवर विजय मिळवला तर उर्वरित जागा अपक्षांना मिळाल्या आहेत.
दरम्यान अकरावीत शिकत असलेला त्यांचा मुलगा आदित्य जाधव याने वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली होती व आई विरोधात रणसिंग फुंकले होते.