पुणे दि.१९ – राज्यात काल ग्रामंपंचायत निवडणुकीचा निकाल घोषित झाला. विजयी झालेल्या उमेदवाराच्या मिरवणुका काढतात मात्र कोरोनामुळे यंदाच्या वर्षी मिरवणुकीला बंदी आहे. मात्र आपल्या कारभाऱ्याला एका पत्नीन थेट खांद्यावर उचलून घेत विजयी मिरवणुक काढली आहे.
पुण्यातील पाळू ग्रामपंचायतीतील विजयी उमेदवार संतोष शंकर गुरव यांची पत्नी रेणूका गुरव यांनी संतोष यांना खांद्यावर घेऊन गावातून फेरी मारली. या उत्साही पती-पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गावातील जाखमाता ग्रामविकास परिवर्तन पॅनलचा दारुण पराभव करत जाखमातादेवी ग्रामविकास पॅनलने सात पैकी 6 जागांवर विजय मिळवला. या विजयामागे महिलांचा मोठा वाटा राहीला.