बीड दि. 19 – बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची अखेर बदली करण्यात आली असून त्यांना विक्रीकर विभागाच्या आयूक्त पदी मुंबई येथे नियूक्ती देण्यात आली आहे. दरम्यान बीड येथे सध्या औरंगाबादला सहायक विक्रीकर आयूक्त म्हणून कार्यरत असलेले आर.एस. जगताप हे जिल्हाधिकारी म्हणून येणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या बदलीच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत्या. ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता शिथील होताच त्यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. रेखावार यांना मुंबई येथे पाठवण्यात आले असून आर.एस. जगताप हे बीडचे जिल्हाधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. जगताप यांनी यापूर्वी बीड जिल्ह्यात अप्पर जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे. फेब्रुवारी महिन्यात बीड येथे आलेल्या रेखावार यांना जिल्हाधिकारी पदावर एक वर्षही पूर्ण करता आले नाही.