नवी दिल्ली दि.१९ – लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना संसदेच्या कँटिनमध्ये सबसिडीच्या दरात मिळणारेे जेवण बंद होणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याबाबत माहिती दिली आहे. ओम बिर्ला म्हणाले,”संसद सदस्य आणि इतरांना संसदेच्या कँटिनमधील जेवणावर दिली जाणारी सबसिडी थांबवण्यात आली आहे. संसदेती कँटीन आता इंडियन टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन चालवणार आहे. यापूर्वी ही जबाबदारी उत्तर रेल्वेकडे होती.
दरम्यान लोकसभा आणि राज्यसभा सदस्यांना नाममात्र दरात जेवण मिळत होते. जेवणाच्या एका थाळीची किंमत 35 रुपये होती. केंद्र सरकारडून सबसिडी दिली जात असल्यामुळे इतक्या कमी रकमेत जेवण दिले जात असे. मात्र, खासदारांच्या जेवणावरील सबसिडी बंद केल्यामुळे केंद्र सरकारचे 8 कोटी रुपये वाचणार आहेत.