केज दि.20 – मागच्या कांही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी अधून मधून केज तालुक्यात बाधित रुग्ण आढळणे सुरूच आहे. दि. 20 रोजी आलेल्या अहवालात केज तालुक्यात चार रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यात 629 प्राप्त अहवालात एकूण 43 रुग्ण बाधित आढळले आहेत.
यामध्ये केज तालुक्यातील सारणी सांगवी येथे एक दहा वर्षाचा मुलगा, उंदरी येथे 20 वर्षीय पुरुष, कळम आंबा येथे 25 वर्षीय पुरुष तर शहरातील धारूर रोड भागात एक 18 वर्षीय तरुण असे चार रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान जिल्ह्यात बीड 16, अंबाजोगाई 15, आष्टी 2, गेवराई 3 तर धारूर, माजलगाव आणि वडवणी येथे प्रत्येकी एक असे रुग्ण आढळून आले आहेत.