मुंबई दि.२१ – दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महत्वाची माहिती दिली आहे. दहावी आणि बारावीची परीक्षा महत्वाची आहे. त्यामुळे परीक्षा कधी घ्यायच्या याचा आढावा आम्ही पुढील बैठकीत घेऊ. परीक्षांबाबत योग्य तो विचार सुरू आहे, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेचं स्थानिक पातळीवर नियोजन केलं जाईल. येत्या 2 फेब्रुवारी किंवा 3 फेब्रुवारीला बैठकीत नियोजन करुन चांगल्या पद्धतीने निर्णय घेतला जाईल, असं बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या मध्यावर किंवा शेवटच्या आठवड्यात घेण्याचा विचार सुरू असल्याचं वर्षा गायकवाड यांनी याआधी म्हटलं होतं. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.