Site icon सक्रिय न्यूज

अखेर दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर…….! ऑनलाइन की ऑफलाईन….? अष्पस्ट…..!

अखेर दहावी बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर…….! ऑनलाइन की ऑफलाईन….? अष्पस्ट…..!

मुंबई दि.२१ – कोरोनामुळे यंदाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कधी होणार याकडे सर्व पालक आणि विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे.

12वीची परीक्षा 23 एप्रिल ते 29 मे 2021 या दरम्यान घेतली जाणार असून या परीक्षेचा निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर केला जाणार आहे. तर 10वीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे 2021 पर्यंत असणार आहे. 10 वीचा निकाल ऑगस्टच्या अखेरीस लागणार आहे, ही माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

गेल्या कित्येक दिवसांपासून पालकांनी परीक्षा केव्हा होणार आहे?, याबाबत विचारणा केली होती. मात्र निश्चित अशी कोणतीही तारीख शिक्षण खात्याकडून दिली जात नव्हती.

दरम्यान, परीक्षा कशा होणार ऑनलाईन की ऑफलाईन?, परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारचं असणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र याआधी परीक्षा ऑनलाईन घेणं कठीण असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं होतं त्यामुळे परीक्षा केंद्रावरच जाऊन द्याव्या लागणार असल्याची शक्यता आहे.

शेअर करा
Exit mobile version