Site icon सक्रिय न्यूज

पाणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा विहिरीत बुडून मृत्यू ,  अडीच महिन्याच्या मुलीसह दोन वर्षाचा मुलगा झाला पोरका……!

केज दि.२१-  तालुक्यातील केवड येथे पिण्यासाठी पाणी आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा विहिरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला. सदरील घटनेमुळे दोन अल्पवयीन मुले अनाथ झाली असून वस्त्यावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
             केवड ता. केज येथे दि. १७ जानेवारी रविवार रोजी सकाळी ८.३०  वा. पारधी वस्तीवर राहत असलेली अनिता अनिल शिंदे ( २१) ही विवाहित महिला त्यांच्या वस्तीजवळ असलेल्या सतिश गोवर्धन सपाटे यांच्या शेतातील विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली होती. विहीरीवर पाणी भरीत असताना ती पाय घसरून विहिरीत पडली. त्यामुळे पाण्यात बुडवून तिचा मृत्यू झाला.
        दरम्यान केज तालुक्यातील अनेक आदिवासी समाजातील वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे. त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा प्रशासनही मूलभूत गरजा याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे तालुक्यातील अशा वस्त्याचे सर्वेक्षण करून पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
    दोन अल्पवयीन मुले झाली पोरकी ……!
विहिरीत बुडून मृत्यमुखी पडलेल्या अनिताला एक दोन वर्षाचा मुलगा व एक केवळ अडीच महिन्याची मुलगी असल्याने आई विना पोरकी झाली आहेत.
शेअर करा
Exit mobile version