मुंबई दि.२२ – सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडें विरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे.
कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचं रेणू शर्मा यांनी पोलिसांना लेखी दिलं आहे. त्यानंतर रेणू शर्मांनी आपल्यालाही ब्लॅकमेल केल्याचा आरोप करणारे भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान बलात्काराचे आरोप म्हणजे खेळ नसून यामध्ये खऱ्या पीडितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. त्यामुळे आता रेणू शर्मा हिच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या चित्रा वाघ यांनी केली आहे.