Site icon सक्रिय न्यूज

एक महिला पाच महिने ऍडमिट, 31 कोरोना टेस्ट, तरीही कोरोना कांही जाईना…….!

बीड दि.23 – मागच्या दहा ते अकरा महिन्यांपासून कोरोना नामक व्हायरस ने जगाला वेठीस धरले आहे. करोडो लोकांना लागण झाली, बहुतांश लोक उपचारानंतर बरे होऊन घरी गेले तर लांखो लोकांना आपला जीव गमवावा लागलेला. मात्र एका महिलेच्या शरीरात  मागच्या पाच महिन्यांपासून घुसलेला कोरोना व्हायरस बाहेर निघण्याचे कांही नाव घेईना.
           त्याचे झाले असे, राजस्थान मधील शारदादेवी नामक महिलेला ऑगस्ट 2020 मध्ये कोरोनाची लागण झाली. त्यानंतर उपचारासाठी तिला सरकारी दवाखान्यात भरती केले. मात्र सुट्टी देण्याच्या वेळेस जेंव्हा तिची पुन्हा टेस्ट करण्यात आली तेंव्हाही ती पॉजिटिव्हच आढळून आली. पुन्हा उपचार सुरू झाले पुन्हा टेस्ट करण्यात आली पुन्हा पॉजिटिव्हच आली. असे एकदा नव्हे दोनदा नव्हे तर तब्बल 31 वेळा टेस्ट केली तरीही सदरील महिला पॉजिटिव्हच  निघत होती. यामध्ये 14 वेळेस आरटीपीसीआर तर 17 वेळेस अँटीजण टेस्ट करण्यात आल्या. असे वारंवार होत असल्याने डॉक्टर्स ही चक्रावून गेले.
           दरम्यान मागच्या पाच महिन्यांपासून सदरील महिला कॉरं टाईन असून तब्येत मात्र ठणठणीत आहे. एवढेच नाही तर त्या महिलेचे पाच महिन्यात वजन सुद्धा आठ किलोने वाढले आहे. आता मात्र आरोग्य प्रशासनाने सदरील महिलेला जयपूर च्या दवाखान्यात पाठवण्याचे ठरवले नेमका हा प्रकार काय ? याची सखोल तपासणी होणार आहे.
शेअर करा
Exit mobile version