Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील महात्मा जोतिबा फुले नाम फलकाची विटंबना, एचपीएम कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी……!

 

केज दि.२३ – शहरातील बीड रोडवरील रेस्ट हाऊस च्या समोरील भागातील महात्मा फुले नगरच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या नाम फलकाची एचपीएम कंपनीने कुणालाही कल्पना न देता मोडतोड केली आहे. नागरिकांच्या भावना दुखावल्या प्रकरणी नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत एचपीएम कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

            केज बीड रोडच्या बाजूला रेस्ट हाऊस समोर सर्व जाती धर्माच्या लोकांची वसाहत आहे. मागच्या कित्येक वर्षांपासून सदरील भागाला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिले असून सदरील भागाची एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे. सदरील भागाच्या प्रवेशद्वारावर महात्मा फुले नगर नावाचा नाम फलक लावलेला होता. मात्र मागच्या एक दीड महिन्यापासून बंद केलेले काम एचपीएम कंपनीने सुरू केले आहे. मात्र कुणालाही कल्पना देता रोडचे खोदकाम करताना सदरील नाम फलकाची मोडतोड करत विटंबना केली. सदरील बाब अतिशय गंभीर असून पुन्हा एकदा एचपीएम कंपनीचा हम करेसो कायद्याची प्रचिती आली आहे.
        दरम्यान एचपीएम कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली असून सदरील निवेदनावर कपिल मस्के,सुदेश सिरसट, उत्तम वाघमारे, मनोज मस्के,अमोल भालेराव, शेखर सिरसट, राहुल शिंदे, अशोक साखरे इत्यादींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा
Exit mobile version