Site icon सक्रिय न्यूज

महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पदांची मोठी भरती, शासन आदेश जारी……!

मुंबई दि.२३ – राज्याच्या पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मध्ये रिक्त असलेल्या ५२९७ पदांची भरती प्रक्रिया कार्यवाहीत आहे. दरम्यान जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक व सशस्त्र पोलीस शिपाई संवर्गातील सेवानिवृत्ती/पदोन्नती/राजीनामा इ. कारणास्तव जवळपास ६७२६ इतकी पदे आणि मिरा-भाईंदर- वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी ७२३१ (६७२६ + ५०५) पदे भरतीसाठी उपलब्ध होणार आहेत. अशाप्रकारे सद्यस्थितीत पोलीस शिपाई संवर्गात एकुण १२५२८ (५२९७ + ७२३१) पदे भरतीसाठी उपलब्ध होत आहेत.
                  दरम्यान कोविड-१९ च्या संसर्गजन्य रोगामुळे सन २०२० -२१ या वित्तीय वर्षात होणाऱ्या  अर्थव्यवस्थेवरील परिणामाबाबत वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या संदर्भाधीन दि. ४ मे २०२० च्या शासन निर्णयान्वये सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता इतर कोणत्याही विभागांना कोणत्याही प्रकारची नवीन पदे भरती करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई संवर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता असल्याने या संवर्गातील सर्व १०० % रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. वरील पार्श्वभुमीवर दि.१३/०९/२०२० रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे तसेच सन २०२० मधील ६७२६ पदे व मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०५ अशी एकूण १२५२८ (५२९७ + ६७२६ + ५०५) पदे १०० % भरण्यासाठी शासन निर्णय, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२०/ प्र.क्र.६५/अर्थ-३, दि.०४ मे, २०२० मधून सूट देण्याच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
                       मा. मंत्रीमंडळाच्या दि.१३/०९/२०२० रोजीच्या बैठकीतील वरील निर्णयानुसार सद्यस्थितीत सन २०१९ या वर्षातील पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात संदर्भाधीन शासन निर्णय वित्त विभाग दि. ०४/०१/२०२० मधून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई संवर्गातील सन २०१९ मधील ५२९७ पदे पदे १०० % भरण्यासाठी शासन निर्णय, वित्त विभाग क्र.अर्थसं-२०२०/ प्र.क्र.६५/अर्थ-३, दि.०४ मे, २०२० मधून सूट देण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे. सन २०२० मधील एकुण ७२३१ ( ६७२६ अधिक ५०५ पदे) पद भरतीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.
                      सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२१०१२११६४५१९५०२९ असा आहे. हा आदेश महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने व्यं.मा.भट (उप सचिव, गृह विभाग) यांनी निर्गमित केला आहे.
शेअर करा
Exit mobile version