केज दि.२४ – तालुक्यातील एका रोपवाटिकेत मजुरी करणाऱ्या ३५ वर्षीय महिलेचा वाईट हेतूने इशारे करून विनयभंग केल्याची घटना युसुफवडगाव ( ता. केज ) येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पीडित ३५ वर्षीय मजूर महिला ही केज तालुक्यातील एका रोपवाटिकेत मजुरी करते. शुक्रवारी ( दि. २२ ) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास सदर महिला नर्सरीत असताना आरोपी बंडू चव्हाण ( रा. पळसखेडा ता. केज ) याने वाईट हेतूने इशारे करून तिचा विनयभंग केला. शनिवारी दुपारी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून बंडू चव्हाण याच्याविरुध्द युसुफवडगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी फरार असून पोलीस नाईक अंगद पिंपळे हे पुढील तपास करत आहेत.