बीड दि. 25 – पोलीस पदकांची घोषणा झाली असून महाराष्ट्रातील एकूण 57 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,13 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी एकूण 946 पोलीस पदक जाहीर झाली असून 89 पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ (पीपीएम), 205 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी) आणि 650 पोलिसांना प्रशंसनीय सेवेसाठी ‘पोलीस पदक’ (पीएम) आणि दोन ‘राष्ट्रपती शौर्य पदक’ जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राला एकूण 57 पदक मिळाली आहेत.
देशातील 89 पोलीस अधिकारी- कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेकरिता राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक जाहीर झाली असून यात महाराष्ट्रातील चार अधिकारी –कर्मचा-यांचा समावेश आहे. यामध्ये बीडचे पोलीस अधीक्षक राजा आर. यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.