Site icon सक्रिय न्यूज

भगवंताच्या प्रसादाप्रमाणे सर्वांचे आशीर्वाद पाठीशी, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया……!

भगवंताच्या प्रसादाप्रमाणे सर्वांचे आशीर्वाद पाठीशी, धनंजय मुंडे यांची प्रतिक्रिया……!

बीड दि.25 – एका महिलेनं राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिनं बलात्काराची केस मागे घेतली. यावर धनंजय मुंडेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

एखाद्या भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. मी शब्दात आभार मानू शकत नाही, असं धनंजय मुंडे म्हणाले. ते बीडमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आजपर्यंत अनेक संकटाला सामोरे गेलो. सामान्य माणसाच्या मनामध्ये स्थान निर्माण करून आज इथपर्यंत पोहोचलो. जीवनामध्ये मी कोणाचेही मन दुखवून स्थान निर्माण केले नाही. मन जिंकून मी स्थान निर्माण केलंय, असं धनंजय मुंडेंनी सांगितलं.आपल्या उपकाराची परतफेड माझ्या अंगावरील कातड्याची जोडे करून जरी आपल्याला घातली तरीही ती फिटू शकत नाही, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

शेअर करा
Exit mobile version