Site icon सक्रिय न्यूज

सौरभ गांगुलीची प्रकृती पुन्हा बघडली, रुग्णालयात दाखल……!

मुंबई दि.27 – बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटर सौरव गांगुलीची पुन्हा प्रकृती बिघडली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्याला कोलकाताच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गांगुलीला मागेसुद्धा असाच त्रास झाल्याने रूग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 7 जानेवारीला गांगुलीला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. ग्रीन कॉरिडोर बनवून सौरव गांगुलीला त्याच्या बेहला येथील घरापासून अपोलो रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं. अपोलो रुग्णालयात डॉ. आफताब खान यांच्या देखरेखीखाली गांगुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, यााआधी गांगुलीला घरातील जिममध्ये व्यायाम करताना छातीत त्रास झाला होता. तेव्हा गांगुलीच्या शस्त्रक्रियेत  ब्लॉकेज काढण्यात आले होते.

शेअर करा
Exit mobile version