Site icon सक्रिय न्यूज

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली कोरोना विषयक दिलासादायक माहिती……! 

नवी दिल्ली दि 28 – कोरोनाबाबतची आजपर्यंतची सर्वात मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील कोरोना स्थितीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. कोरोनाचे संकट पूर्णपणे टळले नसले तरी याच्या प्रसाराचा वेग मंदावला आहे. करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत आहे. बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये नवे करोनाबाधित रुग्ण देखील आढळले नसल्याचे समोर आले आहे.

मागील २४ तासांत देशभरात १४ हजार ३०१ जणांनी करोनावर मात केली आहे. तर, देशात आतापर्यंत १ कोटी ३ लाख ७३ हजार ६०६ जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे.देशभरातील १४७ जिल्ह्यांमध्ये मागील सात दिवसांत करोनाचा रुग्ण आढळलेला नाही. १८ जिल्ह्यांमध्ये मागील १४ दिवासात, सहा जिल्ह्यांमध्ये मागील २१ आणि २१ जिल्ह्यांमध्ये मागील २८ दिवसांत करोनाचा एकही रुग्ण आढळलेली नसल्याची माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली.

दरम्यान, देशभरात मागील २४ तासांमध्ये ११ हजार ६६६ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, १२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता १ कोटी ७ लाख १ हजार १९३ वर पोहचली आहे. देशात सध्या १ लाख ७३ हजार ७४० अॅक्टिव्ह केसेस असून, आतापर्यंत १ लाख ५३ हजार ८४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

शेअर करा
Exit mobile version