बीड दि. 29 – आज दि. 29 रोजी सकाळी 11.55 वा. प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 997 प्राप्त अहवालांपैकी जिल्ह्यात 43 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.
केज तालुक्यातील विडा 2, पिट्ठीघाट 2, चंदन सावरगाव 1, पळसखेडा 1, केज शहर 1, कोरेगाव 1 असे आठ रुग्ण आढळून आले आहेत.
तर जिल्ह्यातील अंबाजोगाई 12, बीड 15, परळी 2, गेवराई 1, आष्टी 3, शिरूर 1, वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान केज तालुक्यात कमी झालेला आकडा वाढल्याने चिंता वाढली असून यात बहुतांश शिक्षकांचा समावेश आहे.