Site icon सक्रिय न्यूज

घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार, उस्मानाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना…..!

घराशेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिघांचा अत्याचार, उस्मानाबाद जिल्ह्यातील खळबळजनक घटना…..!

Stop Sexual abuse Concept, stop violence against Women, international women's day

उस्मानाबाद दि.29 –उस्मानाबाद जिल्ह्यात एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे हा प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उस्मानाबाद जिल्हा हादरला आहे.

पीडित अल्पवयीन ही नराधम राहत असलेल्या घराच्या शेजारी वास्तव्यास होती. नराधम जबरदस्ती तिच्या घरात शिरले. ते मुलीला बळजबरी घरातून उचलून घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या संतापजनक घटनेनंतर संबंधित परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पोस्को कायद्याअंतर्गत आणि कलम 363, 376 अंतगर्त गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना याप्रकरणातील तीन आरोपींपैकी दोन आरोपींना पकडण्यात यश आलं आहे. तर आणखी एका आरोपीचा शोध सुरु आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक जगदीश राऊत हे तपास करीत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिप्परसे यांनी ही माहिती दिली.

शेअर करा
Exit mobile version