Site icon सक्रिय न्यूज

मी सगळं बाहेर काढतो, अण्णा हजारेंनी दिला निर्वाणीचा इशारा……..!

मी सगळं बाहेर काढतो, अण्णा हजारेंनी दिला निर्वाणीचा इशारा……..!

अहमदनगर दि.30 –  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतलं. यावरून शिवसेनेनं सामनाच्या आग्रलेखातून अण्णा नक्की कोणाच्या बाजूने? या सर्व प्रश्नांची उत्तरे निदान महाराष्ट्राला तरी कळू द्या, असा सवाल केला. याला अण्णा हजारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्या वेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो, असं अण्णा हजारे यांनी म्हटलंय.

तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल, असा निर्वाणीचा इशारा अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला. आजचा अग्रलेख लिहिण्याचं कारण काय सांगा?, मग मी सगळं काही बाहेर काढतो, असंही अण्णा हजारे म्हणाले.
शेअर करा
Exit mobile version