बीड दि.३१ – मागच्या आठ दिवसांपासून बीड पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांच्या धाडसी कारवाईमुळे अवैध धंदे करणारे आणि जुगारी यांच्या काळजात धडकी भरली असून गुन्हेगारांना पळताभुई थोडी झाली आहे.
जिल्ह्यात मागच्या आठ दिवसांत अवैध धंद्यांकर पोलिसांची करडी नजर आहे. आणि याचाच एक भाग म्हणून नेकनुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या बाळापुर शिवारातील शेतमालक उत्रेश्वर किसन खिंडकर यांचे शेतातील लिंबाचे झाडाखाली सायंकाळी 5 च्या सुमारास उत्रेश्वर किसन खिंडकर रा.बंकटस्वामी गल्ली नेकनुर, नारायण बबन चौधरी, रा.रोळसगाव ता.जि.बीड, श्रीकृष्ण एकनाथ भागडे, रा.तांदळवाडीघाट ता.जि.बीड, आनंदराव तात्याराव आमटे रा. अंजनवती ता.जि.बीड, नवनाथ कोंडीबा पानतावणे रा.रुटी ता. आष्टी, प्रविण बालासाहेब शिंदे रा. बंकटस्वामीगल्ली नेकनुर, स.फय्याज स.महेमुद रा.मुस्लीममोहल्ला ता.पाटोदा, राजेंद्र चंद्रभान शिंदे रा.कालीकानंगर नेकनुर हे विनापरवाना बेकायदेशीररित्या तिर्रट नावाचा जुगार स्वतःचे फायदेसाठी खेळत व खेळवत होते.
दरम्यान सदरील ठिकाणी विशेष पथकाने धाड टाकली असता जुगाराचे साहीत्य, नगदी-४७०८०/- रु, वाहने किंमत-५९५०००/- रु, मोबाईल हॅन्डसेट किंमत-५६०००/- असा एकुण-६९८०८०/-रु चा मुद्देमाल हस्तगत करून नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस जमादार ए. बी.वाघमारे हे करत आहेत.