बीड दि. 1 – आज दि. 1 रोजी सकाळी 12.5 वा. प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना अहवालात 542 प्राप्त अहवालांपैकी 21 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून केज तालुक्यातील तीन रुग्णांचा समावेश आहे.
केज तालुक्यातील साळेगाव 1, वरपगाव 1 तर शहरातील वकील वाडी भागात 1 असे तीन रुग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील अंबाजोगाई 3, बीड 12, परळी 1, माजलगाव 2 असे रुग्ण आढळून आले आहेत.