केज दि. शहरातील केज अंबाजोगाई रोडवर असलेल्या उपजिल्हा रुग्णालया समोर मंगळवारी (दि.२) दुपारी शिवशाही बसच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
काशीबाई रामभाऊ थोरात रा. बन करंजा असे महिलेचे नाव आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दरम्यान उपजिल्हा रुग्णालया समोर हॉटेल्स, मेडिकल्स असल्याने दवाखान्यात येणाऱ्यांना रस्ता ओलांडून जावे लागत आहे. तर सदरील ठिकाणी राज्यरस्त्याचे काम झाले असल्याने व उताराचा रस्ता असल्याने वाहने अतिशय सुसाट वेगात धावत आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालया समोर दोन्ही बाजूला किमान तीन गतिरोधक बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.