Site icon सक्रिय न्यूज

केज शहरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या…….! कारण अस्पष्ट……!

केज दि. २ – शहरातील उमरी रोड भागात मावशीच्या घरी वास्तव्यास असणाऱ्या एका अंदाजे १५ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना (दि.२) रोजी घडली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून घेतली हे स्पष्ट झालेले नाही.
            संजना अंधारे रा.ढाकेफळ ही अल्पवयीन मुलगी मागच्या कांही महिन्यांपासून तिच्या मावशीकडे राहत होती. मात्र मंगळवारी दुपारी घरी कुणी नसताना घरातील फॅनला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. सदरील घटनेची खबर मिळताच केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार महादेव गुजर, पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे, आशा चौरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. रात्री उशिरा केज पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
शेअर करा
Exit mobile version