परभणी दि.3 – ”माझ्या मुलांचा सांभाळ करा” असे भावनिक स्टेटस ठेवून परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील तिवठाणा गावामधील एका शेतकऱ्याने कर्जवसुलीला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.चंद्रकांत भगवान धोंडगे असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.
धोंडगेंनी आत्महत्येपुर्वी मला पैशासाठी धमक्या येत असून, त्यामुळं मला त्रास झाला आहे. माझ्यानंतर माझ्या मुलांचा सांभाळ करावा उद्या सकाळी मी शेतात आहे सर्वांनी यावे असे व्हाट्सएपवर धोडगेंचं स्टेटस पाहता त्यांचे काका हणमंत धोंडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीनं चंद्रकांत धोंडगे यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
दरम्यान, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी चंद्रकांत धोंडगेंना मृत घोषित केलं. तसंच आत्महत्येप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.