Site icon सक्रिय न्यूज

कृषी विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात आत्मदहन करणार – संतोष तळपे 

कृषी विभागाच्या अनागोंदी कारभारा विरोधात आत्मदहन करणार – संतोष तळपे 
 अंबड दि.3 – कृषी विभाग शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी व शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच विविध योजना राबवल्या त्याची योग्यपणे अंमलबजावणी करण्याचे काम कृषी विभागाचे असते. परंतु या विभागातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना सरकारच्या योजना मिळत नाहीत. याला वाचा फोडण्यासाठी संतोष तळपे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
        तसेच जर माहिती मिळाली तर त्या कामात त्यांना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर उभा राहतात. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक देवाण-घेवाण करण्यास भाग पडते. स्वतःच्या फायद्यासाठी या विभागातील कर्मचारी शेतकऱ्यांची अडवणूक पिळवणूक करतात व आपले ध्येय साध्य करून घेतात. असाच अनागोंदी कारभार अंबड तालुक्यातील कृषी विभागात पहावयास मिळत आहे. येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते संतोष तळपे यांनी सन २०१५ ते आजपर्यंत झालेल्या शेततळे व ठिबक सिंचन योजने च्या कामाची चौकशी करण्याची मागणी केली. परंतु या मागणीला आज रोजी जवळपास तीन महिने उलटून गेले तरीही कुठलीही चौकशी केल्या गेली नाही. वारंवार संपर्क करूनही चौकशीचा अहवाल प्राप्त झालेला नाही.चौकशी करून त्याचा अहवाल देण्यात कृषी विभागातील अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. या पाठीमागे काय गौडबंगाल आहे ? हे समजायला तयार नाही. त्यामुळे आता सत्य बाहेर काढण्यासाठी तालुका कृषी कार्यालय अंबड येथे या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात लवकरच आत्मदहन करणार असल्याची माहिती संतोष तळपे यांनी दिली.
शेअर करा
Exit mobile version