Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात पुन्हा ऑनलाईन फसवणूक, कमी पैशात गाडी देण्याचे दाखवले होते अमिष……..!

केज तालुक्यात पुन्हा ऑनलाईन फसवणूक, कमी पैशात गाडी देण्याचे दाखवले होते अमिष……..!
 केज दि.४ – शाईन एसपी कंपनीची दुचाकी २२ हजार रुपायांमध्ये देतोत असे आमिष दाखवून एका तरुणास दोघांनी ५५ हजार ९०० रुपायास गंडा घातल्याची घटना केज तालुक्यातील येवता येथे घडली आहे. याप्रकरणी केज पोलिसात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
         येवता येथील दशरथ सोपान राऊत या तरुणास प्रल्हादसिंग पटेल ( रा. पिंपरी चिंचवड ) व विकास पटेल ( रा. मध्यप्रदेश ) या दोघांनी ओएलएक्स अकाऊंटवर शाईन एसपी कंपनीची दुचाकी २२ हजार रुपयांमध्ये देतोत असे आमिष दाखविले. त्यांनी राऊत यांच्याकडून ६ व ७ जानेवारी २०२१ या दोन दिवसात फोन पे व गुगल पे वरून ५५ हजार ९०० रुपये मागवून घेतले. राऊत यांनी त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. मात्र त्यांनी दुचाकी दिली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दशरथ राऊत यांनी केज पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून प्रल्हादसिंग पटेल व विकास पटेल या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बीडच्या सायबर क्राईम पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे
शेअर करा
Exit mobile version