Site icon सक्रिय न्यूज

पंकजा मुंडेंच्या अपेक्षेला धनंजय मुंडे यांचे प्रतिउत्तर……..!

पंकजा मुंडेंच्या अपेक्षेला धनंजय मुंडे यांचे प्रतिउत्तर……..!
बीड दि.५ – आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या कर्माची फळं मिळत असतात. आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आपण माणूस म्हणून जन्म घेतला असल्याने आपल्या समोर काही आदर्श असतो आणि तो आदर्श बघून आपणही आदर्श निर्माण करतो, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त तिथे आज महापूजेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या.
              खूप बलिदान करावं लागतं. खूप कठीण परिस्थीतून जगावं लागतं. तेव्हा लोकं त्यांच्या मृत्यूनंतर वर्षोंवर्ष त्यांची आठवण काढतात. मग ते नेते असतील किंवा संत. असंच गोपीनाथ मुंडे यांची आठवण आजही आपल्या डोळ्यांसमोर आहे. खूप कष्ट करावे लागतात. ते कष्ट समाजाला समर्पित करावे लागतात, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

माणसाचा जन्म काहीतरी करुन दाखवायचं आहे. परोपकाराने काम करायचं. संस्काराने काम करायचं. क्षमा ज्याच्या मनामध्ये आहे, त्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची वासना कधीही जागा ठेवू शकत नाही, असं पंकजा म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी जिल्ह्याच्या विकासाबाबत अपेक्षा व्यक्त केल्यानंतर येणाऱ्या 4 वर्षात जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्याचं आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून नाही तर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळख देण्याचं आव्हान आपण स्वीकारल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. या गहिनीनाथ गडाची, या मतदारसंघाची आणि बीड दिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी आपण सर्वांच्या साक्षीनं आपल्या खांद्यावर घेत असल्याचं घोषणाच धनंजय मुंडे यांनी यावेळी केली. जनतेच्या मनात जनतेचं मन सांभाळून काम केलं तर आशीर्वाद कमी पडत नाहीत. आजच्या संकटातही आपल्या डोक्यावर जनतेचे आशीर्वाद असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा
Exit mobile version