Site icon सक्रिय न्यूज

केज शहरातील मोंढ्यात चोरी, पोलीसात गुन्हा दाखल……!

केज दि.५ – केज कळंब रोडवर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागील एका आडत दुकानावर अज्ञात चोरट्यांनी चोरी करून तुरीचे कट्टे पळवले आहेत.
        मोंढ्यात संदीप अंकुश इंगळे यांचे आडत दुकान आहे.सदर आडतीवर ५०/५० किलोचे ११ कट्टे तूर ठेवली होती. मात्र गुरुवारी (दि.४) रोजी रात्री १२ ते पहाटे ४ च्या दरम्यान सदरील कट्ट्यातून ७ कट्टे  चोरून नेले आहेत, ज्याची किंमत २१०००/- आहे. संदीप इंगळे यांच्या तक्रारीवरून केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक फौजदार महादेव गुजर हे करत आहेत.
       दरम्यान मागच्या कांही महिन्यांपासून शहरात चोरीचे प्रमाण वाढले असून पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे, तर चोरटे निर्ढावले आहेत.
शेअर करा
Exit mobile version