मुंबई दि.६ – SSC MTS 2020 परीक्षा 1 जुलै ते 20 जुलै दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन अर्थात SSCने शुक्रवारी मल्टी टास्किंग स्टाफ अर्थात MTS भरती परीक्षेसाठी रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरु केली आहे. जे लोक 10 वी पास आहेत ते या परीक्षेसाठी अर्ज करु शकतात. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑफिशियल वेबसाईट ssc.nic.in वर जाऊन अर्ज करु शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च आहे.
भरती प्रक्रियेत 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. मात्र, आरक्षणानुसार वयोमर्यादेत बदल करण्यात आला आहे. SSC ऑनलाईन टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपरच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. डिस्क्रिप्टिव्ह पेपर हा क्वालीफाय प्रकारचा आहे आणि तो उमेदवाराच्या भाषा कौशल्याबद्दल जाणून घेण्यासाठी घेतली जाते.
दरम्यान ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख – 5 फेब्रुवारी 2021, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मार्च 2021 आहे.तर ऑनलाईन शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख – 23 मार्च 2021 आहे. तसेच ऑफलाईन चलन भरण्याची शेवटची तारीख – 25 मार्च 2021, चलनाद्वारे शुल्क भरण्याची शेवटची तारीख 29 मार्च 2021 आहे. टियर – 1 (पेपर-1) सीबीटीची तारीख 1 जुलै ते 20 जुलै 2021 तर टियर – 2 (पेपर -2) डिस्क्रिप्टिव्ह पेपर – 21 नोव्हेंबर 2021 आहे.