Site icon सक्रिय न्यूज

”मी” ही चार वेळा प्रेमात पडलो, मात्र लग्नापर्यंत पोंहोचलो नाही……! एका भारतीय यशस्वी व्यक्तीचा खुलासा…..!

”मी” ही चार वेळा प्रेमात पडलो, मात्र लग्नापर्यंत पोंहोचलो नाही……! एका भारतीय यशस्वी व्यक्तीचा खुलासा…..!

मुंबई दि.6 –  टाटा उद्योग समुहाचे माजी प्रमुख रतन टाटा अविवाहित आहेत. नुकतंच एका मुलाखतीत रतन टाटा यांनी लग्नाविषयी मोठा खुलासा केला आहे.एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रतन टाटा यांनी त्यांच्या प्रेमाविषयी आणि अविवाहित राहण्यामागचं कारण सांगितलं आहे.

मी 4 वेळा प्रेम करुन लग्नावर गंभीर विचार केला. मात्र प्रत्येकवेळी मी कोणत्या ना कोणत्या कारणाने मागे हटलो, असं रतन रतन टाटांनी सांगितलं. मलाही प्रेम झालं होतं, मात्र मला माझ्या प्रेमाला लग्नापर्यंत नेता आलं नाही. मात्र दूरगामी विचार केला तर लग्न न करण्याचा माझा निर्णय योग्य ठरला. कारण मी लग्न केलं असतं तर आताची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची राहिली असती, असं रतन टाटा म्हणाले.

शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version