गेवराई दि. ७ – शहरातील राजर्षी शाहू महाराज नगर मध्ये त्यागमुर्ती माता रमाई यांची १२३ वी जंयती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.
जगाला संविधान अर्पण करून धर्मनिरपेक्ष शिकवण देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांच्या जिवनात अमुल्य स्थान असणा-या त्यांच्या अर्धागिनी माता रमाई यांचा त्यागमय जिवन प्रवास अंखड जगाला माहीती आहे. रात्रंदिवस काबाडकष्ट करूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मोलाचे योगदान दिले. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या माता रमाई यांची १२३ वी जंयती गेवराई शहरातील ताकडगाव रोड परिसरातील राजर्षी शाहू महाराज नगर मध्ये आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.