केज दि.८ – नव्यानेच स्थापन झालेल्या केज तालुका झुंजार पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर झाली असुन अध्यक्षी पदी दशरथ चवरे तर सचिवपदी दत्तात्रय हंडीबाग यांची निवड झाली आहे.
केज येथील विश्राम गृहात झालेल्या बैठकीत नवनिर्वाचित झुंजार पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी दशरथ चौरे तर सचिवपदी दत्तात्रय हंडीबाग यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी सतीश केजकर, नंदकुमार मोरे, अनिल गलांडे, रमेश ईतापे, अशोक भोसले, बळीराम भोसले, गोविंद शिनगारे,अर्शद शेख, मनोराम पवार, दिनकर राऊत, जावेद शेख, शरद लोंढे, श्रीराम तांदळे, बाळासाहेब ठोंबरे,अंकुश जोगदंड यांची उपस्थिती होती.