केज दि.८ – पतीला मारहाण होत असल्याचे ऐकून घरातून बाहेर आलेल्या ४० वर्षीय महिलेस लोखंडी गजाने मारहाण करीत डोके फोडून तिचा विनयभंग केल्याची घटना केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी एका महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
केज तालुक्यातील डोणगाव येथील आरोपी अंकुश दगडु भुसारे, तेजेस अंकुश भुसारे, मंगलबाई अंकुश भुसारे हे तिघे जण पीडित महिलेच्या पतीस शिवीगाळ करून मारहाण करीत असताना ओरडण्याचा आवाज ऐकून पीडित महिला ही घराबाहेर आली. याचवेळी अंकुश भुसारे याने पीडित महिलेच्या डोक्यात लोखंडी गज मारून डोके फोडले. तर तेजेस भुसारे याने पीडितेची साडी ओढत विनयभंग केला. ही घटना चार फेब्रुवारी रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास घडली. आठ फेब्रुवारी रोजी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अंकुश भुसारे, तेजेस भुसारे, मंगलबाई भुसारे या तिघांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार दिनकर पुरी हे पुढील तपास करत आहेत.