नवी दिल्ली दि.10 – नेहरू युवा केंद्राने 2021-22 साठी 13,206 स्वयंसेवकांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी असल्याने अनेकांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे. अधिसूचनेनुसार देशातील तरुणांना संघटनेच्या विविध विकासात्मक कामांसाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी एका वर्षासाठी नियुक्त केले जाईल. तर निवडलेल्या तरुणांना 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 पर्यंत भरती केले जाईल. या वेळी उमेदवारांना महिन्याला 5000 रुपये वेतन दिले जाईल. इच्छुक लोक nyks.nic.in या अधिकृत वेबसाईटवर 20 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
एकूण 13206 स्वयंसेवक पदासाठी दहावी पास तरुण अर्ज करू शकतात. यासह उमेदवाराला इंटरनेट, संगणक आणि मोबाईल यांसारख्या तंत्रज्ञानाचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे, जेणेकरून ते ऑनलाइन कार्य करू शकतील.18 ते 29 वर्षांचे तरुण स्वयंसेवकांच्या भरतीसाठी अर्ज पात्र असणार आहेत. उमेदवारांच्या निवडीसाठी गुणवत्ता यादी तयार केली जाईल, त्या आधारे त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीतल्या कामगिरीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.