Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील केवडची जिल्हास्पर्धेसाठी निवड…….! गावच्या विकासासाठी ग्रामस्थ सरसावले…..!

केज  दि.११ – गाव स्वच्छ रहावे गावचा सर्वागिण विकास व्हावा या साठी राज्य सरकारने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या नावे सुरू करण्यात आलेली स्मार्ट ग्राम योजना सन २०१९-२० मधे  राज्यात राबवण्यात आली होती.
                    बीड जिल्यातुन केज तालुका स्तरावर मौजे केवडची स्मार्ट ग्राम म्हणुन निवड झाल्यानंतर आता जिल्हास्तरीय स्पर्धेत केवडचा समावेश झाला आहे. तालुका स्तरावर २० लाखाचे बक्षीस मिळवत जिल्हास्तरीय स्पर्धेत देखील प्रथम क्रमांक मिळवुन ६० लाखाचे बक्षीस मिळवण्यासाठी व गावच्या विकासासाठी सर्व ग्रामस्थ सरसावले आहेत. केवड गावचा जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभाग झाल्याने जि. प. बीडचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी आज केवडला भेट देऊन पाहणी केली.
                  या वेळी सरपंच केशर सर्जेराव सपाटे. दिलीप सपाटे ग्रामसेवक सुखदेव कांबळे, ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
शेअर करा
Exit mobile version