बीड दि.१२ – जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी होत आहे. मात्र महसुल विभाग याची दखल घेत नाही. वारवांर वाळू चोरीचे प्रकार वाढले आहेत. मात्र मागच्या एक महिन्यापासून पोलीस अधीक्षक यांनी नेमलेल्या विशेष पथकाचे प्रमुख विलास हजारे यांनी धडाकेबाज कारवाया करत अनेक ठिकाणी छापे मारून मोठ्या कारवाया केल्यामुळे वाळू माफियांसह अवैध धंदे करणाऱ्यांच्या उरात धडकी भरली आहे.
गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान गेवराई तालुक्यातील संगम जळगाव येथील चोरटी वाहतूक करणारे चार टॅक्ट्ररसह ३२ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये वाहन चालक अण्णासाहेब नारायण शिंदे , श्याम भानुदास देवकते , अनिल अशोक पारेकर , सुनिल गिरीजा मगरे या चौघां चालकांना ताब्यात घेऊन मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफूल्ल साबळे करत आहेत.