बीड दि.१२ – येथील जालना रोडवरील वीर हॉस्पिटलच्या वाहनतळानजीकच्या शौचालयात एक मृत अर्भक गुरुवारी (दि.११) सायंकाळी आढळून आले होते.याप्रकरणी शहर पोलिसांनी तपास सुरु केला असून ‘त्या’ अर्भक प्रकरणी एका महिलेचा जवाब नोंदविण्यात आला.यामध्ये तिन्हे कबुली ही दिली असून दोघांच्या डीएनए तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी दिली.
शहरातील जालना रोडवर वीर हॉस्पिटल असून गुरुवारी (दि.११) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास मेडिकलवर कामाला असणारे ओमप्रकाश शेटे हे वाहन पार्किंगमधील सार्वजिनक शौचालयात गेले. यावेळी त्यांना येथे एक अर्भक दिसले. त्यांनी ही माहिती डॉ.संजय वीर यांना दिल्यानंतर तात्काळ शहर पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली.घटनास्थळी शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप हे पथकासह दाखल होत तपास सुरु केला.यावेळी सीसीटीव्ही कॅमेरेद्वारे संशियत महिलेला ताब्यात घेत तिचा जवाब नोंदविला असता तिन्हे अर्भक तिचेच असल्याची कबुली दिली.मात्र त्या अर्भकासह तिची डीएनए तपासणी करण्यात येणार असून यानंतर कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलीस निरीक्षक रवि सानप यांनी दिली.