अंबाजोगाईत दि.१३ – कोरोना हद्दपार होत असताना पुन्हा तालुक्यात रुग्न संख्येत वाढ होत असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी एकाच दिवसात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शहरात घडली आहे.
शहरातील एका शिक्षकाचा प्रथम दर्शनी कोरोना पॉजीटिव रिपोर्ट आला. मात्र नंतर निगेटिव रिपोर्ट आला होता.परंतु त्याचे वडिल, भाऊ यांचे रिपोर्ट पॉजिटिव आल्याने 40 वर्षीय शिक्षक मुलाचा घाबरुन हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी राञी निधन झाले. शुक्रवारी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले असता शनिवारी रक्षा सावडण्याच्या अगोदरच वडीलांचाही मृत्यू कोरोनानेच झाला त्यामुळे कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला.
दरम्यान त्याच कुटुंबातील एक मुलगा व मयत मुलाची आई रुग्नालयात कोरोनाशी लढत आहेत. तर घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला असतानाही घरातीलच व्यक्तीच्या अंत्यविधीला उपस्थित राहता आले नाही असे दुर्दैवी चित्र आज दिसून आले. तर शहरातील अन्य एका भागातील 64 वर्षीय इसमाचाही मृत्यू कोरोनानेच झाल्याने एकाच दिवशी तीन मृत्यू झाले असून शहरात हळहळ व्यक्त होत आहे.