Site icon सक्रिय न्यूज

विनाअनुदानित शाळांना अनुदान, अध्यादेश जारी………!

विनाअनुदानित शाळांना अनुदान, अध्यादेश जारी………!

मुंबई दि.१४ – मागील वीस वर्षांपासून विनाअनुदानित शाळांवर कार्यरत असलेल्या तब्बल 17 हजार 199 शिक्षकांना 40 तर 1 हजार 70 शिक्षकांना 20 टक्के अनुदान देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे. यासंबंधीचा अध्यादेश शनिवारी शालेय शिक्षण विभागाने जारी केला.

शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार मूल्यांकनानंतर अनुदानासाठी करण्यात आलेल्या तपासणीत पात्र ठरलेल्या प्रपत्र ‘अ’ मधील 61 माध्यमिक शाळांमधील 308 शिक्षक व 206 शिक्षकेतर पदे आणि प्रपत्र ‘ब’ मधील 181 माध्यमिक शाळांच्या 543 वर्ग, तुकडय़ांवरील 762 शिक्षक पदे अशा एकूण 1 हजार 70 शिक्षक व 206 शिक्षकेतर पदांना 1 नोव्हेंबर 2020 पासून 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

तर ज्या शाळांना यापूर्वी 20 टक्के अनुदान मिळाले होते त्यांना वाढीव 40 टक्के अनुदान देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. वाढीव 20 टक्के अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांमध्ये प्रपत्र ‘अ’मधील नमूद केलेल्या 1 हजार 553 माध्यमिक शाळांमधील 5 हजार 545 शिक्षक व 5 हजार 775 शिक्षकेतर पदे आणि प्रपत्र ‘ब’मधील 1 हजार 38 माध्यमिक शाळांच्या 2 हजार 771 वर्ग तुकडय़ांवरील 3779 शिक्षक पदे अशा एकूण 11 हजार 524 शिक्षक व 5 हजार 775 शिक्षकेतर एकूण 17 हजार 299 पदांना 1 नोव्हेंबर 2020 पासून वाढीव 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

दरम्यान 20 टक्के अनुदान आणि वाढीव अनुदानाच्या संदर्भात ज्या शाळांचे प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत अथवा त्रुटी काढण्यात आले आहेत अशा शाळांना त्रुटीची पूर्तता करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे पुढील 30 दिवसांत आपले प्रस्ताव सादर करावे लागणार आहेत. त्यानंतर या शाळांचा निर्णय घेतला जाणार आहे.

शेअर करा
Exit mobile version