Site icon सक्रिय न्यूज

मला धमक्या देऊन वेळ वाया घालवू नका……!

मला धमक्या देऊन वेळ वाया घालवू नका……!

मुंबई दि.१४ – बी़ड जिल्ह्यातील परळी वैज्यनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून मंत्री संजय राठोड यांचं नाव उघडपणे घेतलं होतं.

भाजप नेत्या आणि महिला प्रदेशआध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. यामुळे चित्रा वाघ यांना अनेकांनी फोन करुन धमकवण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर देत धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका, जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारच असं म्हटलंय.

तर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारले असता तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला देखील चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

शेअर करा
Exit mobile version