Site icon सक्रिय न्यूज

16 मजूर ठार…….!

जळगाव दि.१५ – जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे भीषण अपघात घडला आहे. केळी वाहून नेणारा ट्रक उलटल्याने ट्रक मधील पंधरा मजूर ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
          धुळे जिल्ह्यातील नेर येथून एक आयशर ट्रक केळी भरून रावेरकडे येत होता. यावल तालुक्‍यातील किनगाव नजीक हा ट्रक अचानक उलटला. यात ट्रक मधील 16 मजूर ठार झाले आहेत. या ट्रकमध्ये एकूण 21 मजूर होते, अशी माहिती मिळाली आहे.घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात ठार झालेल्या मजुरांमध्ये रावेर तालुक्यातील अभोडा, केऱ्हाळा तसेच रावेर शहरातील मजुरांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version